Railway mega block sakal media
मुंबई

रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर दिवसकालीन तर, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लाॅक

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर (Western railway) रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (Railway repairing work) रविवारी (ता.17) रोजी मेगाब्लॉक (Sunday mega block) घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येईल. त्यामुळे रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल. हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मुख्य मार्गिका आणि आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे, अशी माहिती मध्य रेल्वे (central railway) प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल जलद अप आणि डाऊन मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील. तर, पुढे या लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी /वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावरसीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी /बेलापूर /पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा, सीएसएमटी ते वांद्रे /गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधी पनवेल आणि कुर्लावरील फलाट क्रमांक 8 वरून विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील.

कुठे : वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवार-रविवारच्या मध्यरात्री 11.50 ते पहाटे 4.30 पर्यंत

परिणाम : ब्लाॅकच्यावेळी अप आणि डाऊन मार्गावरील सर्व मेल, एक्स्प्रेस 15 मिनिटे उशिराने धावतील. तर, गाडी क्रमांक 09101 विरार-भरूच मेमू पहाटे 4.35 ऐवजी पहाटे 4.50 वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT