Ticket checking sakal media
मुंबई

मुंबई : फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 20 लाखांची दंड वसुली

कुलदीप घायवट

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western railway) मुंबई सेंट्रल विभागाद्वारे (Mumbai central division) एकदिवसीय तिकीट तपासणी (ticket checking) अभियान राबविली. यात संपूर्ण मुंबई सेंट्रल विभागातील स्थानकावर, एक्सप्रेस, लोकलमध्ये तिकीट तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4 हजार विना तिकीट प्रवाशांवर (Ticketless commuters) कारवाई करून 20 लाख 14 हजार रुपयांची दंड वसुली (fine collection) केली आहे.

सोमवारी, (ता.18) रोजी मुंबई सेंट्रल विभागात एकदिवसीय तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 167 तिकिट चेकिंग स्टाफ आणि 20 रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी होते. यांच्याद्वारे तिकीट तपासणी होत होती. या अभियानात एकूण 4 हजार विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणारे प्रवासी असे प्रकरण नोंदविण्यात आली. यातून एका दिवसातच 20 लाख 14 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. चालू वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक दंड वसूली आहे. या आर्थिक वर्षात तिकीट चेकिंग स्टाफने एकूण 11 कोटी 11 लाखांची दंड वसूली केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

राज्यसरकारने अनुमती दिलेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रवाशांशिवाय इतर प्रवाशांनी स्थानक परिसर अथवा लोकलमधून प्रवास करू नये. यासह प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करावा. प्रवासात कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF News: EPF धारकांसाठी 9 मोठे बदल! PF व्याज ते 5 लाखांपर्यंत ऑटो क्लेम नेमकं काय-काय बदललं? मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Vijay Thalapathy : 'बीअरसाठी १० रुपये जास्त घेतले'; मुख्यमंत्री विजय थलपतींना थेट तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Update : कोस्टल रोडच्या बोगद्यात अनेक गाड्यांची धडक, एक गाडी पेटली

Revenue Officers Arrest : बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन् वंशावळ! मठाची 100 कोटींची जमीन हडपण्याचा डाव; 6 महसूल अधिकाऱ्यांसह 11 जणांना बेड्या

Ad Free Videos : आता Youtube वर येणार नाही जाहिरात! बघा नॉनस्टॉप व्हिडिओ; फ्रीमध्ये वापरा 'हे' फीचर, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT