Mumbai Rain Sakal
मुंबई

Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस; रस्ते वाहतूक मंदावली

मुंबईत दिवसभर पावसाने कोसळधार सुरु ठेवली होती. अंधेरी सबवे, गांधी मार्केट येथे पाणी साचल्याने येथील वाहतूकीवर कोंडी झाली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई व उपनगरांत सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळल्याने सखल भागात पाणी साचले. नेहमीप्रमाणे अंधेरी सबवेत पाणी साचले. पावसाने जोर कायम ठेवल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. पुढील २१ जुलै पर्यंत मुंबई व बाजूच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत दिवसभर पावसाने कोसळधार सुरु ठेवली होती. अंधेरी सबवे, गांधी मार्केट येथे पाणी साचल्याने येथील वाहतूकीवर कोंडी झाली. मुंबई महापालिकेने सखळ भागात साचणा-या पाण्याच्या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा काही वेळात निचरा झाला.

जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती तर रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत होती. दुपारी समुद्राला भरती होती. समुद्रात ४.२१ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. यावेळी जोरदार पाऊसही असल्याने परिसरात पाणी साचू नये यासाठी पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. दरम्यान हवामान विभागाने १८, २० व २१ जुलैला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर १९ जुलै रोजी रेड अलर्ट जाहिर केला आहे.

पावसाची नोंद -

शहर - ४४.०८ मिमी

पूर्व उपनगर - ३९.०८ मिमी

पश्चिम उपनगर - ३२.७५ मिमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT