Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : पावसामुळे लोकलचा वेग मंदावला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना लेटमार्क !

२ वाजेनंतर संध्याकाळी मध्य रेल्वे मार्गावरील सेवा सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने लोकल सेवा धावत असल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर अडकून तात्कळत लोकलची वाट पाहत रहावे लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळीपासून सुरु असलेल्या पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवांचा गतीवर मर्यादा आली होती. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद लोकल सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना कार्यालयात पोहचण्यासाठी आठवड्याचा पहिल्याच दिवशी लेटमार्क लागला आहे.

मुंबई आणि उपनगरात सोमवारी पहाटे पासून पाऊस सुरु झाला, त्यामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या.

विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या जलद लोकल २० ते ३० मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटाने सकाळी विलंबाने धावत होत्या. त्यानंतर दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास पावसा जोर कमी झाल्यावर काही कालावधीसाठी लोकल सेवानी गती घेतली. मात्र, हवेतील दृश्यमानता कमी होताच लोकल सेवा पुन्हा धीम्या गतीने धावू लागल्या.

२ वाजेनंतर संध्याकाळी मध्य रेल्वे मार्गावरील सेवा सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने लोकल सेवा धावत असल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर अडकून तात्कळत लोकलची वाट पाहत रहावे लागत आहे. पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलेटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो

यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांचा वेगावर बंधने येतात. परिणामी लोकलचे वेळापत्रक कोलमडते. मात्र . आठवड्याचा पहिल्याच दिवशी दिवसभरात लोकलची वाहतुक ठप्प झाली नसली तरी रेल्वेची वाहतुक विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT