Mumbai - Pune Expressway 
मुंबई

Mumbai - Pune Expressway : मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरू; आडोशी बोगद्याजवळ वाहनांच्या रांगा

सकाळ डिजिटल टीम

मावळ : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र दरड कोससळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र अजुनही आडोशी बोगद्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. आता तीनपैकी दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. एक लेन अजुनही बंद आहे. (Latest Marathi News)

एक लेन बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरील लगदा रात्री अडीच वाजेपर्यंत हटविण्यात आली होता. त्यामुळे दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र वाहतूक धिम्म्या गतीने सुरू आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांची अडचण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT