speed breaker  sakal
मुंबई

Mumbai Rain Ubdate : पाऊस आला धावुन अन् गतिरोधक गेला वाहून !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Rain Ubdate : कांदिवली पूर्व येथील ९० फुटी मार्गावरील सेंट लॉरेन्स शाळेसमोरील गतिरोधक पावसाच्‍या पाण्याने वाहून गेला आहे. त्‍यामुळे या गतिरोधकाची डागडुजी करावी किंवा तो नव्‍याने बांधण्यात यावा, अशी मागणी पालकवर्गांकडून करण्यात येत आहे.

येथील पोईसर झोपडपट्टी विभागातील गावदेवी मार्गाला जोडणारा ९० फुटी मार्ग पुढे पश्‍चिम द्रुतगती मार्गाला जातो. या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच या मार्गावर सेंट लॉरेन्स इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.

शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्‍त्‍यावरील गतिरोधक मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्‍यामुळे वाहने अतिवेगाने चालवण्यात येत आहेत. शाळेच्‍या आवारात विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्‍यामुळे एखादा अपघात होण्याची भीती पालकांकडून व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

त्‍यामुळे पालिकेने तत्‍काळ येथील गतिरोधक नव्‍याने बांधावा, अशी मागणी पालकांसह रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद घटली; खासदार गेले, आता संसद भवनातील ऑफिसही जाण्याची शक्यता

Mumbai Local: ‘मयंकला न्याय मिळालाच पाहिजे’; आरोपीला फाशीची शिक्षा द्या, कुटुंबीयांची आर्त मागणी

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

SCROLL FOR NEXT