mumbai rain update first day rain monsoon imd rain forecast weather  Sakal
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा लुटला आनंद; तर नोकरी व कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांची उडाली तारांबळ

मुंबईत रात्रीपासून पावसाने सुरुवात केली. शनिवारीही सकाळपासून मुंबई उपनगरांत पावसाने हजेरी लावत दमदार बरसला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईकरांनी जोरदार पावसाचा आनंद लुटला. पावसाने मुंबईत आज दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने सायन येथील गांधी मार्केट येथे पाणीही साचले. येत्या ४८ तासांत मुंबईत सक्रीय होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईत रात्रीपासून पावसाने सुरुवात केली. शनिवारीही सकाळपासून मुंबई उपनगरांत पावसाने हजेरी लावत दमदार बरसला. पावसाचे वातावरण तयार झाल्याने पाऊस सक्रीय होणार अशी आशा निर्माण झाली. पहिल्याच पावसाचा मुंबईकरांनी आनंद लुटला.

सकाळी ११ नंतर पाऊस थांबला व पुन्हा उकाडा सुरु झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आणि पावसाने जोरदार बरसाय़ला सुरुवात केली. त्यामुळे नोकरी व कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या तारांबळ उडाली.

बरसणा-य़ा पावसांत गरमा गरम वडा पाव, कांदा भजीचा आस्वाद घेतला. तरुणाईने तर मुंबईच्या समुद्र किना-य़ावर, सोसायट्या परिसर तसेच विविध ठिकाणी पावसात चिंब भिजत एन्जॉय केला. संध्याकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबईच्या अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले, विक्रोळी येथे जोरदार पाऊस कोसळला. सायन येथील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले.

झाड कोसळून १० गाड्यांचे नुकसान

जोरदार पावसामुळे मलबार हिल, वाळकेश्वर येथील एका रस्त्याच्या बाजूला झाड कोसळून १० कारचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. यात कोणीही जखमी झाले नाही.

येथे भरले पाणी

अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले, विक्रोळी, सायन, चेंबूर, अँटोप हिल, सीएसटी, चर्चगेट आदी भागात जोरदार पाऊस झाला.

गांधी मार्केटमध्ये पाणी साचले

जोरदार पावसामुळे मुंबईत सायन - किंग्जसर्कल येथील गांधी मार्केटमध्ये पाणी साचले. हा सखल भाग असल्याने येथे दरवर्षीच्या पावसांत पाणी साचते. यंदाही पहिल्याच पावसांत येथे पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी, रहिवाशांची धावपळ उडाली. पालिकेने पंप लावल्याने येथील काही वेळातच पाण्याचा निचरा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT