Mumbai Rain Updates esakal
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईत जोरदार पाऊस; पुढील दोन दिवस मुसळधार कोसळणार

दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सलग तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर दमदार कोसळलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. आज पावसाने दुपारनंतर काहीशी विश्रांती घेत आपली रिमझिम सुरू ठेवली होती. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूकही मंदावली होती. येत्या दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या रविवारी आणि सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. सलग पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. सायन येथील गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, अंधेरी, मालाड, मानखुर्द, वाशी नाका आदी सखल भागांत पाणी साचले.

दुपारनंतर काहीशी उसंत घेत पावसाने आपली रिमझिम सुरू ठेवली होती. वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. या पावसात मुंबईतील चौपाट्या, समुद्र किनाऱ्यांवर तरुणाईने गर्दी करीत आनंद लुटला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT