मुंबई

मुंबईकरांना हायअलर्ट, थोड्याच वेळात समुद्रात उंच लाटा उसळणार

पूजा विचारे

मुंबई-  जुलै महिन्यापासून मुंबईत मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. आज पुन्हा मुंबईत हाय टाईडचा इशारा देण्यात आला आहे. थोड्याच वेळात म्हणजेच दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रात ४.२६ मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईकरांनी समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. 

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता 

मुंबईसह ठाणे आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे.  मुंबईसह उपनगरात तसंच ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोकण, तळकोकण भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. येत्या ४८ तासात हीच परिस्थिती कायम असेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना सतर्क, सुसज्ज आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पालिकेच्या सर्व विभाग नियंत्रण कक्षांना 'हाय अलर्ट' देण्यात आले असून मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश दिलेत. 

गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात 58.3 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद सांताक्रुज वेधशाळेत करण्यात आली आहे. तर दक्षिण मुबंईतील कोलाबा वेधशाळेत 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

mumbai rain update high tide 4.26 meter expected

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: प्रतीक्षा संपली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज, 'या' महिन्यात होणार उद्घाटन

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

Digital Arrest: कुटुंबासह बॅंक अधिकाऱ्याला एक महिना; ‘डिजिटल अरेस्ट’, ३९ लाखांनी घातला गंडा, सायबर पोलिसांत गुन्हा

Chh. Sambhajinagar Accident: सिडकोतील जळगाव रस्ता परिसरात भरधाव कारने उडवला वृद्ध पशुवैद्यक, घटनास्थळीच मृत्यू

Pune Traffic: नवले पुलाजवळील सेवारस्ता धोकादायक; नऱ्ह्यात सांडपाणी वाहिनीवरील झाकणे गायब, अपघाताची शक्यता

SCROLL FOR NEXT