Mumbai Rain Update: दोन तासांपासून डाऊन जलद मार्गावरील लोकल - एक्सप्रेस खोळंबल्या sakal
मुंबई

Mumbai Rain Update: दोन तासांपासून डाऊन जलद मार्गावरील लोकल - एक्सप्रेस खोळंबल्या

Mumbai Local Latets Update: : ठाकुर्लीजवळ मऊ एक्सप्रेस गाडीच्या इंजिन मध्ये बिघाड

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Railway : मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी लोकलसेवा कोलमडली. तर दुपारी 2 च्या सुमारास याच रेल्वे स्थानकाजवळ मऊ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडली. यामुळे या गाडीच्या मागे वंदे भारत, आसनगाव, अंबरनाथ, अयोध्या कैंट एक्सप्रेस अशा गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या.

मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सकाळ पासूनच काही ना काही कारणाने रेल्वेचा खोळंबा होऊन लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी 8 च्या दरम्यान कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानक दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली होती.

परिणामी लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यात हा खोळंबा झाल्याने चाकरमानी, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. लोकलसेवा सुरळीत सुरू होत नाही तोच दुपारी डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी बंद पडली.

परिणामी डाऊन दिशेच्या जलद मार्गावर ठाकुर्ली ते दिवा स्थानका पर्यत लोकल व एक्सप्रेसच्या रांगांच्या रांगा लागल्या. या एक्सप्रेसच्या पाठीमागे आसनगाव, अंबरनाथ, अयोध्या कैंट एक्सप्रेस, वंदे भारत या गाड्या जागच्या जागीच दोन ते तीन तास उभ्या होत्या.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना याविषयी सूचना केली जात आहे. गाडीच्या इंजिन मधील तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून हा बिघाड नीट होताच गाडी पुढे रवाना करण्यात येईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT