Mumbai Rain Update Sakal
मुंबई

Mumbai Rain Update : पहिल्याच पावसात डोंबिवली बदलापूर महामार्गावर पाणीच पाणी

नेवाळीत नाल्यांची सफाई नाही...नाले तुंबले नेवाळी चौकात पाणीच पाणी.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली- पावसाचा फारसा जोर नसतानाही अवघ्या काही मिनिटांच्या पावसात नेवाळी चौकात पाणीच पाणी झाले आहे. एमआयडीसीने नाल्यांची सफाई केली नसल्याने नाले तुंबून पहिल्याच पावसात ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे.

नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. येथील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून वाहनकोंडी चा सामना वाहनचालकांना करावा लागला.

डोंबिवली बदलापूर महामार्गावरील नेवाळी चौकात किरकोळ पावसानेच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर परिसरात एमआयडीसीच्या मालकीचे असलेले नाले एमआयडीसी ने साफ केले नसल्याने नाल्यातील पाणी थेट महामार्गावर येऊन वाहन चालकांची मोठी कोंडी झाली.

महामार्गावरील डोंबिवली दिशेला येणाऱ्या मार्गिकेवर हे पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील दुकान मालक देखील धास्तावले आहेत. शेजारीच असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या आवारात देखील पाणी साचल्याने शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय झाली.

या महामार्गावरुन सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. नाल्यांची सफाई झाली नाही तसेच रस्त्याच्या कडेला विविध भागांतील घंटागाड्यांतून कचरा खाली केला जातो. हा साचलेला कचरा देखील या नाल्यांत वाहून गेल्याने नाले तुंबले आहेत. या परिस्थितीकडे एमआयडीसी प्रशासन लक्ष देते का हे आता पहावे लागेल.

या संदर्भात नेवाळी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधला असता नाले एमआयडीसीचे असल्याने त्यांचे काम असल्याचे सांगून ग्रामपंचायतीने आपले हात वर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT