Mumbai Rain Sakal
मुंबई

Mumbai Orange Alert : मुंबईला उदया पावसाचा ऑरेंज अलर्ट

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. सलग तीन दिवस संततधार कोसळलेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पावसाने आज काहीशी उसंत घेत सरीने कोसळला. दिवसभऱ ढगाळ वातावरण होते. अचानक जोरदार सरीने पाऊस कोसळत राहिल्याने कार्यालय सुट़ल्यानंतर चाकरमान्यांनी तारांबळ झाली. हवामान विभागाने उदया पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहिर केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. सलग तीन दिवस संततधार कोसळलेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीला फटका झाला. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे ठप्प झाली.

गुरुवारीही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहिर करण्यात आली. दुपारपर्यंत पाऊस जोरदार सरीने कोसळला. दुपारनंतर मात्र काहीशी उसंत घेत अधून मधून सरीने बरसला. हवामान विभागाच्या जोरदार पावसाच्या इशा-यामुळे काहींनी कार्यालय सुटल्यानंतर घर गाठण्यासाठी घाई केली. तर काहींनी अडकून पडायला नको म्हणून सुट्टी घेऊन घरीच राहणे पसंत केले. दरम्यान शुक्रवारीही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पावसाची नोंद - (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

शहर - २१.५१ मिमी

पूर्व उपनगर - २३.८७

पश्चिम उपनगर - २१.८३

२५ ठिकाणी झाडे पडली

मुंबईत वा-यासह सरीने पडलेल्या पावसामुळे शहरात ९. पूर्व उपनगरांत ३, पश्चिम उपनगरांत १३ अशा एकूण २५ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. तर दोन ठिकाणी घरे पडल्याच्या घटना घडल्या.

घाटकोपर येथे डोंगरावरील माती घसरुन झाड कोसळले

घाटकोपर पश्चिम येथील खैरानी रोड, जंगलेश्वर मंदिर या ठिकाणी डोंगरावरील माती घसरुन रामजी नगर येथील झाड मंदिराच्या छतावर कोसळले. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने आजू बाजूच्या २५ ते ३० घरांमधील अंदाजे १०० लोकांना भटवाडी येथील बर्वेनगर पालिका शाळा क्रमांक १ या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT