मुंबई

मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते म्हणतायत आता मुंबईकरांना नुकसानभरपाई द्या

कृष्ण जोशी

मुंबई: परवाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गरीब मुंबईकरांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. कांदीवलीचे आमदार अतुल भातखळकर, घाटकोपरचे आमदार पराग शहा, नगरसेविका शीतल गंभीर देसाई व राजेश्री शिरवडकर आदींनी ही मागणी केली आहे. नुकसान झालेल्यांना तातडीने घरटी दहा हजार रुपये मदत द्यावी, असे भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. 

मंगळवारी, बुधवारी मुंबई पडलेल्या पावसामुळे झोपडपट्टी तसेच चाळीत राहणाऱ्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी आल्याने त्यांचे सर्व साहित्य वाया गेले. लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक विवंचनेत असताना नैसर्गिक आपत्तीने लोकांचे नुकसान झाल्याने सरकारने त्यांना दिलासा देणे जरुरी आहे. कालच मुंबई महापालिका आयुक्तांनी या पावसासंदर्भात बोलताना हे छोटे वादळ असल्याचे म्हटले आहे. 12 तासात मुंबईमध्ये 294 मिमी एवढा पाऊस झाला, याचाच अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून सरकारने नजरअंदाज सर्वेक्षण करावे. हे सर्वेक्षण घरटी न करता वस्तीशः करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. 

कोरोनाच्या संपूर्ण कालखंडामध्ये उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक झालेली नाही. या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती नंतरतरी उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपनगरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश द्यावेत अशीही मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे. 

नुकसानभरपाईची पद्धत ठरवा

अतिवृष्टीमुळे कोणाचे किती नुकसान झाले, त्यांना नुकसानभरपाई कशी देणार हे ठरवायला हवे, पण दुकानदार आणि झोपडीवासीय यांचे नुकसान सरकारने काहीअंशी तर भरून दिलेच पाहिजे. शेतकऱ्यांप्रमाणेच शहरातील रहिवाशांनाही निदान एकरकमी नुकसानभरपाई द्यावी, असे घाटकोपरचे आमदार पराग शहा यांनी सकाळ ला सांगितले. 

दुकानांचेही नुकसान झाले

या अतिवृष्टीत रहिवाशांबरोबरच दुकानांचेही नुकसान झाले असल्याने त्यांनादेखील नुकसानभरपाई द्या, अशी मागणी माहीमच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई आणि प्रभाग क्रमांक 172 च्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी केली आहे. पाण्यामुळे दुकानदारांचे फर्निचर खराब झालेच पण दुकानातील साहित्य तसेच अन्नधान्य, खाद्यपदार्थ हे देखील नष्ट झाले आहेत. कोरोनाच्या दुष्काळात अतिवृष्टीचा तेरावा महिना आल्यामुळे सरकारने नागरिकांना मदत करावी, असे पत्र श्रीमती शिरवडकर व श्रीमती देसाई यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

mumbai rains bjp leaders demands monsoon compensation for mumbaikar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: आम्ही स्वतःला जाळून घेऊ! बेकायदा इमारतीमधील राहिवाशांची आर्त हाक; डोंबिवलीत काय घडलं?

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर 'ही' अभिनेत्री साकारणार पुर्णा आजीची भूमिका? 'त्या' गोष्टीमुळे चर्चेला उधाण

Asia Cup 2025: आक्रमक होणारच! IND vs PAK सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार अन् पाकिस्तानी सलमान आघाने फुंकले रणशिंग

Pitru Paksha 2025: शॉपिंगसाठी ‘या’ तारखा शुभ, दोष न लागता पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील

Crime News : परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या दोघींना अटक; नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT