Union Minister of State Ramdas Athavale sakal
मुंबई

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'बिबळ्या वाघ' (पँथर) घेतला दत्तक

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) घेतला दत्तक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजने अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी आज रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून पँथर दत्तक घेतला.यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले उपस्थित होत्या. वन अधीक्षक एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा तृतीय वाढदिवस आज केक कापुन आणि बुद्ध वंदना घेऊन साजरा करण्यात आला.

रिपाइंचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी बिबळ्या वाघ (पँथर) सिम्बा ला भेटण्यास ना.रामदास आठवले; त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले आणि पुत्र जित आठवले आले असता सर्वजण सिम्बा सिम्बा असा बिबळ्या वाघाला आवाज देत होते मात्र त्याने कुणाला ही दाद दिली नाही.मात्र रामदास आठवले यांनी आवाज दिल्यानंतर मात्र बिबळ्या त्यांच्याजवळ येऊन उभा राहायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT