रामदास आठवले Sakal
मुंबई

Mumbai : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 चौरस फुटाचे घर द्या रामदास आठवले यांचा निवडणूक अजेंडा

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाचा मेळावा चुनाभट्टी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडी धारकांना 500 चौरस फुटाचे घर द्या, 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधरकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी, असा निवडणूक अजेंडा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केला आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश  रिपब्लिकन पक्षाचा मेळावा चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात काल पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय शिवसेना महायुतीचा विजय 3निश्चित आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर होईल. 5 वर्षात पहिला अडीज वर्ष टर्म उपमहापौर आरपीआय चा आणि दुसरा टर्म  उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास  केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. 

आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआय च्या उमेदवारांना ही निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आठवले यांनी केले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार  आशिष शेलार यांनी 5 वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल, असे आश्वासन दिले.

गेल्या 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधरकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 फूटांचे घर देण्यात यावे तसेच खाजगी इमारतींना काल मर्यादा गुणवत्ता यासाठी रेरा प्राधिकरण आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ही गुणवत्ता आणि इमारती बांधण्यासाठी निश्चित कालमर्यादा पाळणासाठी रेरा सारखे प्राधिकरण असावे, मुंबईत बंजारा भवन; कक्कया भवन बांधावे आदी ठराव या मेळाव्यात मंजूर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT