अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्ह्यांत मुंबई दुसऱ्या स्थानी! 
मुंबई

अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्ह्यांत मुंबई दुसऱ्या स्थानी!

अनिश पाटील

मुंबई : दिल्लीपाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 2018 मध्ये मुंबईत 3511 अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन 2019 मध्ये 3640 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

केंद्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीबीआरबी) 2019 च्या आकडेवारीनुसार मुंबईत अल्पवयीन मुलांच्या हत्येचे 13 गुन्हे मुंबईत घडले आहेत; तर अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मारहाणीचे 50 गुन्हे दाखल झाले आहेत. गंभीर मारहाणीचे 13 गुन्हे 2019 मध्ये मुंबईत दाखल झाले होते. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुंबईत मानवी तस्करीचे 20 गुन्हे मुंबईत दाखल असून, त्यात 69 पीडित मुलांचा समावेश आहे. 

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्‍सो) 2019 मध्ये मुंबईत 1319 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याबाबतही मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीमध्ये पोक्‍सोअंतर्गत सर्वाधिक 1662 गुन्ह्यांची नोंद झाली होती. अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या 622 गुन्ह्यांची नोंद झाली आहे; तर विनयभंगाचे 609 गुन्हे दाखल झाले होते. याबाबत मुंबईत देशात प्रथम क्रमांकावर आहे. मुंबईत 2019 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराचे 46 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. 

सलग तीन वर्ष दिल्ली, मुंबई आघाडीवर 
अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीत गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीनंतर मुंबई देशात आघाडीवर आहे. दिल्लीत 2017, 2018 व 2019 मध्ये अनुक्रमे 6844, 6853 व 7565 गुन्ह्यांची नोंद झाली होती. दिल्ली याबाबत देशात आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलांविरोधात सर्वाधिक गुन्हे घडले आहे. मुंबई 2017 पासून 2019 पर्यंत अनुक्रमे 3790, 3511 व 3640 गुन्ह्यांची नोंद झाली होती. 

तुलनात्मक आकडेवारी 

वर्ष मुंबईतील गुन्ह्यांची संख्या दिल्लीतील गुन्ह्यांची संख्या
2017 3790 6844
2018 3511 6853
2019 3640 3640

---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

SCROLL FOR NEXT