ssc-hsc-students sakal media
मुंबई

मुंबई विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनी घेतली SSC-HSC परीक्षा केंद्रांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra education board) सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत (ssc and hsc exam) कॉपीला आळा घालण्यासाठी मुंबई विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनी मुंबईतील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष (inspection at exam center) जाऊन झाडाझडती घेतली. अध्यक्षांनी कांदिवली आणि परिसरातील परीक्षा केंद्रात अचानकपणे येऊन केलेल्या तपासणीमुळे येथील केंद्रप्रमुख आणि परीक्षा केंद्रातील शिक्षकांची तारांबळ उडाली. या वेळी अनेक ठिकाणी त्रुटी आढळून आल्या.

कांदिवली परिसरात असलेल्या ठाकूर महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे येत्या काळात त्यात दुरुस्ती करण्याचे आदेश दिले जातील, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी दिली. येथील शिक्षकांना तसेच केंद्रप्रमुखांनाही विविध प्रकारच्या सूचना दिल्या. पेपर संपल्यानंतर अनेकांशी गप्पा मारून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, असे उपासनी यांनी सांगितले.

कॉपीची प्रकरणे समोर आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच परीक्षा केंद्रामध्ये एक तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे पालन किती प्रमाणात होते हेही यादरम्यान आपल्याला लक्षात आल्याचेही उपासनी यांनी सांगितले. उद्या (सोमवार, ता. २१) बारावीचा पेपर असून त्याच्या पार्श्वभूमीवर पेपर साठवणूक कक्ष आदी ठिकाणी जाऊन आपण पेपरचे वितरण कशाप्रकारे केले जात आहे याची माहिती घेतल्याचेही उपासनी यांनी सांगितले. मुंबई आणि परिसरातील अनेक परीक्षा केंद्रांवर सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेणार असल्याचेही उपासनी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT