छगन भुजबळ इसकाळ
मुंबई

Maharashtra Sadan Scam: ईडीची मागणी मान्य! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना दिलासा पण..

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका मागे घेण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. परंतु छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळाविरोधातील खटला मात्र ईडीने मागे घेतलेला नाही.दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठापुढे या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात येत असल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, याचिका मागे घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयानेही ईडीची मागणी मान्य केली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीने 2016 मध्ये अटक केली होती. त्यानंतर, 2 वर्षांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता.या निर्णयाला ईडीने 2018 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दुसरीकडे, विशेष न्यायालयानेही 16 ऑक्टोबर रोजी भुजबळ यांना पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी देत परदेशात जाण्याची अनुंमती दिली होती.

हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आले. त्यावेळी याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. न्यायालयानेही ईडीच्या या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त करत याचिका नेमकी कशासाठी केली हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने ईडीला वेळ दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT