मुंबई

मुंबईत हवेचे वाढते प्रदूषण; अंधेरी, नवी मुंबईत हवा अतिशय वाईट

भाग्यश्री भुवड

मुंबई: राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे थंडी आणि वाढलेली आर्द्रता अनुभवायला मिळत आहे. यासारख्या असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

सफर या हवेच्या गुणवत्ता दर्शवणाऱ्या संस्थेने मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदबाद या चार शहरांच्या हवेची गुणवत्तची नोंद केली आहे. या संस्थेने मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) मध्ये नववर्षाच्या सुरुवातीच्या काळात आणि फेब्रुवारीत ही वायू प्रदूषण वाढल्याची नोंद केली आहे.

दरम्यान, मुंबईत हवेचे प्रदूषण वाढले असून सर्वाधिक अंधेरी आणि नवी मुंबईत अतिशय वाईट दर्जाची हवा नोंदवण्यात आली आहे.

मुंबई संपूर्ण शहराची हवा वाईट नोंदली असून 239 (एक्यूआय) हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.  मुंबईतील कुलाबा, मालाड, बीकेसी, चेंबूर या ठिकाणी हवा वाईट असल्याची नोंद केली होती.  यातील सर्वात प्रदूषित झालेल्या ठिकाणांमध्ये नवी मुंबई  313, अंधेरी  311 या ठिकाणी सर्वात वाईट हवा नोंदवण्यात आली. तर, भांडूप 114, माझगाव 197, वरळी 132, बोरीवली 193 या ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या हवेची नोंद करण्यात आली.

भांडूप -मध्यम
माझगाव - मध्यम
वरळी - मध्यम
बोरीवली - मध्यम
नवी मुंबई - अतिशय वाईट - 313
अंधेरी - अतिशय वाईट 311

वायू प्रदूषणाचे काय परिणाम?

वृद्ध आणि मुले यांना विशेषत: वायू प्रदूषणाचा जास्त परिणाम होतो. शिवाय, सह-व्याधी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रूग्ण आणि सीओपीडी रुग्णांना जास्त धोका असतो. गंभीर लोकांव्यतिरिक्त, निरोगी लोकांना डोळ्यांमध्ये खाज सुटणे, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर जेवण करणे, औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. 

आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन सी चा समावेश करणेही गरजेचे आहे. तसेच प्रदूषणादरम्यान गर्दीची ठिकाणे टाळा. घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. सामाजिक अंतर राखून ठेवा आणि वेळोवेळी आपले हात धुवा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

आजार असलेल्या लोकांनी वेळेवर औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन सी, गर्दीची ठिकाणे टाळा, बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका, सामाजिक अंतर राखून ठेवा आणि वेळोवेळी आपले हात धुवा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. 

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai rise air pollution Contaminated air reported suburbs Navi Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी अपडेट; जाणून घ्या २,००० रुपये कधी मिळणार?

Manoj Jarange Patil: राज्यातील भाजप सरकार उलथवून लावण्याची गरज: मनाेज जरांगे-पाटील, बंगालमध्ये गडबड केल्याचा संशय!

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Mumbai Terror Case : 'हिंदू राष्ट्रात खरा जिहाद दिसेल...'; जैब अन्सारीच्या घरात सापडली धक्कादायक चिठ्ठी, मिरा रोडमध्ये नेमका काय कट रचला?

sugarcane FRP Increase : एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ, शेतकऱ्याला प्रतिटनासाठीचा दर जाहीर; कोल्हापूर विभागाची एफआरपी किती?

SCROLL FOR NEXT