MMRDA sakal media
मुंबई

मुंबई : मिठागरांचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी होणार सल्लागाराची नेमणूक

निविदेला पुन्हा मुदतवाढ : 20 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार निविदा

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबईतील मिठागरांच्या जमिनीचा (Mumbai Salt Pan land) समुचित वापर करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे (MMRDA) बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार कंपनीची (Advisory company) नेमणूक करण्यात येणार असून या कामासाठी एमएमआरडीएने (MMRDA Tender) निविदा काढली आहे. मात्र कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत निविदा सादर करता येईल. तर 22 ऑक्टोबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहेत.

मिठागरांच्या जमिनीवर उद्याने, क्रीडांगण निर्माण करणे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशीलक्षेत्र वगळता उर्वरीत भागांवर सामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी नियोजन करता येईल काय याविषयीच्या प्रस्तावांचा बृहत आराखड्यामध्ये अंतर्भाव करण्याबाबत विचार व्हावा, असे राज्य सरकारने उच्चाधिकार समितीला सुचविण्यात आले आहे. त्यानुसार सरकारने बृहत आराखडा तयार करण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे सोपवली आहे.

याकामी सल्लागाराची नेमूणक करण्यासाठी एमएमआरडीएने जुलै महिन्यात इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएने तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार स्वारस्य दाखविणाऱ्या कंपनीस 20 ऑक्टोबरपर्यंत निविदा भरता येईल. तर यावेळी निविदेला प्रतिसाद लाभल्यास 22 तारखेला निविदा खुली करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT