school Sakal media
मुंबई

मुंबई : पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी BMC ची जय्यत तयारी

शाळांना देण्यात आल्या पुन्हा सूचना

संजीव भागवत

मुंबई : मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी, 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या (First to seven standards) शाळा सुरू (School starts) होणार आहेत. यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडून (BMC Education Department) जोरदार तयारी सुरू (preparation starts) करण्यात आली आहे. या शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण आज महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने मुंबईतील पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी 30 नोव्हेंबरलाच निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या सर्व सूचना शिक्षण विभागाने संबंधित शाळांनाही देण्यात आल्या आहेत. मात्र काही शाळांना याविषयीची माहिती मिळाली नसल्याने त्या पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या शाळा सुरू करण्यासाठी मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात काही राहिलेल्या त्रुटी यावर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, अशी सांशकता ही पालकांमध्ये व्यक्ती केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान 15 डिसेंबरपासून मुंबईत सुरु होणाऱ्या पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी कोणतेही बंधन नाही, ते ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. त्यात या शाळा आणि वर्ग हे केवळ तीन ते चार तासांपेक्षा अधिक नसाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळेत आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईत आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया पालक संघटनेचे प्रवीण यादव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT