Mumbai sakal
मुंबई

Mumbai : सेन्सेक्सची सलग चौथी वाढ; सेन्सेक्स १२२ अंश वाढला

आज निफ्टी मध्ये कोटक बँक, बजाज फिन्सर्व्ह, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी लाइफ या शेअरचे भाव वाढले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - परदेशी वित्तसंस्थांच्या खरेदीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजार निर्देशांक सलग चौथ्या दिवशी वाढले. आज सेन्सेक्स १२२.७५ अंश तर निफ्टी ३५.२० अंश वाढला.

भारतीय शेअरचे भाव आज दिवसभर वर खाली होत होते, मात्र शेवटच्या तासात खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स निर्देशांक पुन्हा नफ्यात आले. दिवस अखेरीस सेन्सेक्स ६२,९६९.१३ अंशावर तर निफ्टी १८,६३३.८५ अंशावर स्थिरावला. आज बँका, वित्तसंस्था, एफ.एम.सी.जी., आयटी यांचे शेअर वाढले तर वाहन निर्मिती कंपन्या, औषध निर्मिती कंपन्या, धातू निर्मिती क्षेत्र आणि ऊर्जा निर्मिती कंपन्या यांचे शेअर घसरले.

आज निफ्टी मध्ये कोटक बँक, बजाज फिन्सर्व्ह, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी लाइफ या शेअरचे भाव वाढले. तर निफ्टी मध्ये हिंदालको, अदानी एंटरप्राइजेस, टेक महिंद्र, टाटा स्टील, डॉ. रेड्डी लॅब यांचे भाव घसरले. बीएससी ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक, विप्रो यांचे भाव एक टक्का वाढले. टेक महिंद्र, टाटा स्टील, सन फार्मा यांचे भाव एक टक्क्याच्या आसपास घसरले.

मिडकॅप इंडेक्स आणि बँक निफ्टी सर्वकालिक उच्चांकावर असल्यामुळे आता निफ्टी देखील नवा सर्वकालिक उच्चांक गाठण्याच्या पातळीवर आहे. सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT