share marketing latest sakal
मुंबई

Mumbai : चांगल्या निकालांमुळे सेन्सेक्स साठ हजार;निफ्टी १७,७४३.४० अंशांवर स्थिरावला

आज दुपारपर्यंत सेन्सेक्स साठ हजारांच्या खालीच होता, त्यानंतर जोरदार खरेदी सुरु झाली व सेन्सेक्स साठ हजारांच्या वर गेला. दिवसअखेर सेन्सेक्स ६०,०५६.१० अंशांवर तर निफ्टी १७,७४३.४० अंशांवर स्थिरावला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आयसीआयसीआय बँकेसह काही बड्या अर्थसंस्थांचे निकाल चांगले आल्यामुळे आज शेअरबाजारात उत्साह संचारला व सेन्सेक्सने पुन्हा साठ हजारांना गवसणी घातली. आज सेन्सेक्स ४०१.०४ अंश तर निफ्टी ११९.३५ अंश वाढला.

आज दुपारपर्यंत सेन्सेक्स साठ हजारांच्या खालीच होता, त्यानंतर जोरदार खरेदी सुरु झाली व सेन्सेक्स साठ हजारांच्या वर गेला. दिवसअखेर सेन्सेक्स ६०,०५६.१० अंशांवर तर निफ्टी १७,७४३.४० अंशांवर स्थिरावला.

आज बँका-अर्थसंस्था तसेच बांधकाम व्यवसाय कंपन्यांचे शेअर तेजीत होते, तर औषधनिर्मिती आणि वाहननिर्मिती कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले.

मागील आठवड्यात आयटी शेअरच्या अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे बाजारात आलेले निराशेचे वातावरण अर्थसंस्थांच्या चांगल्या निकालांमुळे दूर झालेच, पण आयटी व बँकांच्या शेअरमध्ये तळाच्या भावाला खरेदीही झाली. आज निफ्टीमधील मुख्य ३६ शेअरचे तर सेन्सेक्सच्या प्रमुख २७ शेअरचे भाव वाढले.

आज सेन्सेक्समधील विप्रो, टायटन, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक, स्टेटबँक या शेअरचे भाव दोन टक्के वाढले.

तर अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, नेस्ले, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स या शेअरचे भाव एक टक्क्याच्या आसपास वाढले. दुसरीकडे इंडसइंड बँक, मारुती, सनफार्मा, एअरटेल या शेअरच्या भावात घसरण झाली.

तळाच्या भावाला शेअरबाजारांमध्ये चांगली खरेदी होत आहे, यापुढेही शेअरबाजार विशिष्ठ टप्प्यातच फिरत राहील, मात्र बाजाराचा कल वाढण्याच्याच अपेक्षेत आहे. मोठ्या कंपन्यांच्या निकालांकडे तसेच अमेरिका, जर्मनी, फ्रान्स यांच्या जीडीपी तपशीलाकडे तसेच बँक ऑफ जपानच्या व्याजदराच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष राहील. - सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

रुपया १५ पैसे वाढला

शेअरबाजारात झालेली वाढ आणि कमी होत चाललेले कच्च्या तेलाचे दर यामुळे आज रुपयाचा भाव अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १५ पैसे वाढून तो ८१.९१ वर स्थिरावला. आज रुपयाचे व्यवहार ८२.०८ वर सुरु झाले, दिवसभरात तो ८१.८८ पर्यंत वाढला तर ८२.०९ पर्यंत घसरला होता. शुक्रवारी रुपया ८२.०६ वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT