Prakash Ambedkar esakal
मुंबई

Prakash Ambedkar: "सोबत असो वा नसो, आपल्याला..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचे एका दगडात २ पक्षी

Prakash Ambedkar: काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरु झाली होती. आज या यात्रेचा मुंबईत समारोप झाला. आज रविवारी शिवाजी पार्कवर काँग्रेसची भव्य सभा झाली.

Sandip Kapde

Prakash Ambedkar:

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरु झाली होती. आज या यात्रेचा मुंबईत समारोप झाला.  आज रविवारी शिवाजी पार्कवर काँग्रेसची भव्य सभा झाली. या सभेत इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. सभेपूर्वी राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. शरद पवार, मेहबुबा मुफ्ती, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर या सभेत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची ही पहिलीच सभा आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित केले. त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. जागावाटपावरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावता तर नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर देखील टीका केली.

आपल्या सर्वांना लढावं लागेल. एकत्र लढू किंवा वेगळं लढू, पण आपल्याला लढावं लागणार आहे, असे प्रकश आंबेडकर म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर भाजपवर हल्लाबोल केला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहीजे. मोदींचा देश परिवार आहे असे म्हणतात पण त्यांचा परिवारातील व्यक्ती त्यांच्यासोबत राहत नाहीत. मोदींनी त्यांच्यासोबत राहायला हवं. कारण ही आपली संस्कृती आहे. आरएसएसने याबाबत सांगितले आहे. (Latest Marathi News)

ईव्हीएम मशिनवर देखील प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. ईव्हीएम मशिन अमेरिकेतून येते पण त्यातील चिप २० ते २५ रुपयाला बाजारात विकत मिळतात.  ईव्हीएम चौकशीसाठी सर्वांना लढावं लागेल. राहुल गांधींनी पुढाकर घेतला तर आम्ही लढायला तयार आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: आज कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT