Mumbai  Sakal
मुंबई

Mumbai : धक्कादायक ! 14 वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती, अल्पवयीन विद्यार्थांकडून अत्याचार

पीडित गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - 14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर 16 वर्षीय मुलाने अत्याचार केला. यात ती मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली.

तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार 14 वर्षीय पीडित मुलगी ही शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून ती एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर पोलिसांच्या ताब्यात असलेला अल्पवीयन विद्याथीं हा त्याच परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

गेल्या काही महिन्यापासून दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. नंतर दोघांचे प्रेम संबंध जुळले. त्यानंतर नेहमीच शाळा - महाविद्यालयात जाण्याच्या बाहण्याने ते दोघे एकमेकांना भेटत होते. मात्र त्यांच्या दोघांच्याही घरच्यांना त्यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नव्हती.

प्रेम जुळल्याने दोघे एकमेकांना भेटत असताना त्या अल्पवयीन विद्यार्थांकडून पीडित शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. मात्र यामुळे काय घडेल त्याची कल्पना दोघांना नव्हती. त्यातच अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागले.

उपचारासाठी तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले असता, पीडित मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला. दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारीवरून शुक्रवारी 4 ऑगस्टला अल्पवीयन विद्यार्थांवर अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून याचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT