Mumbai  
मुंबई

Mumbai : धक्कादायक! मॅनहोलमधील ड्रेनेज साफ ​​करताना कामगाराच्या अंगावरून गेली गाडी अन्...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशभरात ड्रेनेज लाईन साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गुदमरून किंवा विषारी वायुमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र मुंबईतील कांदिवली येथे एक धक्कादायक घटना घडली असून मॅनहोलमध्ये ड्रेनेजलाईन साफ करून बाहेर येत असलेल्या कामगाराच्या अंगावरून गाडी गेल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या कांदिवली डहाणूकरवाडी परिसरातून ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. डहाणूकरवाडी परिसरातील रस्त्यावरील मेन हॉल सफाई करण्यासाठी उतरलेला कर्मचारी पुन्हा बाहेर येत असताना त्याच्या अंगावरून कार गेली. कार अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

कामगाराला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक विनोद आणि कंत्रालदार अशा दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी चालक विनोद उधवानी यांच्यासह कंत्राटदारावरही निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कलम 196 सह कलम 279, 336 आणि 338 अंतर्गत कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र सफाई कामगाराच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणात कलम ३०४ जोडले आहे.

ड्रेनेज साफसफाई करताना सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न केल्याप्रकरणी कंत्राटदार अजय शुक्लालाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I: वैभव सूर्यवंशी ओपनिंगला येणार? तिसऱ्या ट्वेंटी-२०त भारताच्या Playing XI मध्ये चक्रावरणारे प्रयोग दिसणार...

एआयमुळे भारतातील नव्या नोकऱ्यांचे बदलणार स्वरूप; तरुणांच्या प्रशिक्षणावर होणार परिणाम

Chakan Onion Market: कांद्यानं हसवलं, दुष्काळानं रडवलं! चाकण बाजारात भाव वाढले; उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Live News : अमित शहा २ नोव्हेंबर रोजी तेलंगणा भाजपच्या 'पदयात्रेत सहभागी होणार

Sachin Tendulkar Ganpatipule Visit : क्रिकेटचा देव बाप्पापुढे नतमस्तक! सचिन तेंडुलकर यांनी घेतले गणपतीपुळेतील प्रसिद्ध स्वयंभू गणपतीचे दर्शन, लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी

SCROLL FOR NEXT