Mumbai  
मुंबई

Mumbai : पुनर्रोपणाच्या नावावर झाडांची कत्तल! मुंबई मेट्रो प्रकल्पात पुनर्रोपित ६४ टक्के झाडांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई मेट्रोने पुनर्रोपित केलेली ६४ टक्के झाडे ही काळजी न घेतल्याने मृत झाल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून झाडांची पुनर्रोपण प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने केली जात नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. एखादे झाड पुनर्रोपित करण्याची प्रक्रिया कठीण असून त्यासाठी योग्य देखरेख करणारी यंत्रणा मुंबई मेट्रोकडे नाही का? असा सवालही पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे.

'कुलाबा-वांद्रे- सीप्झ' मेट्रो ३चे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरु आहे. ही मार्गिका सुरुवातीपासूनच वृक्षतोडीमुळे वादाचे कारण ठरली आहे. अशातच आता पुन्हा एकदा माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीमुळे पर्यावरण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मेट्रो ३ च्या कामांतर्गत पुनर्रोपित करण्यात आलेल्या ६६५ झाडांपैकी केवळ २३१ झाडे जगली तर ४३४ झाडांचा मृत्यू झाला. आरे वसाहतीस इतर भागात पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांबाबतचा अहवाल वॉचडॉग फौंडेशनचे निकोलस अल्मेंडा यांनी मागविला होता. याबाबत मुंबई मेट्रोकडून आलेल्या माहितीतून ही धक्कादायक परिस्थिती समोर आली.

या वृक्षांचे पुनर्रोपण कसे होते?

एखाद्या प्रकल्प ठिकाणी वृक्षतोड करण्यास मनाई आणि वृक्षप्रेमींचा विरोध यामुळे प्रकल्पाजागेवर येणाऱ्या वृक्षाचे पुनर्रोपण केले जाते. हे पुनर्रोपण करण्याची शास्त्रीय पद्धती आहे. यानुसार, लिफ्ट अँड शिफ्ट म्हणजे क्रेनच्या साहाय्याने एखादे झाड मुळापासून काढून काही अंतरावरच दुसऱ्या खड्ड्यात पुनर्रोपित केले जाते. हे पुनर्रोपित करत असताना झाडांची किमान ८० टक्के मूळ झाडांना असणे गरजेचे आहे.

झाड शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञांच्या देखरेखीतच जमिनीतून काढले जाते. पुनर्रोपित करताना ही मूळ घट्ट होण्यासाठी नियमित देखभाल आणि खतांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा ही खर्चिक आणि वेळखाऊ पद्धती समजून न अवलंबल्यास झाडाचा काही दिवसातच मृत्यू होतो.

झाडं म्हणजे एक जीव आहे. विकासकाम जीवघेणी ठरत आहेत. झाडं जमिनीतून काढताना चुकीच्या पद्धतीने काढली जातात त्यामुळे काही दिवसात त्यांचा मृत्यू होतो. वृक्ष प्राधिकरणाची लोकही या झाडांचे पुनर्रोपण करताना तिथे नसतात. मेट्रोच्या कारभारामुळे अनेक झाडांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी तर खोटी आहे.

-निकोलस अल्मेंडा, वॉचडॉग फाऊंडेशन

मुंबई मेट्रोला झाडांशी आणि निसर्गाशी काही देणंघेणं नाही. त्यांना फक्त प्रक्रिया झाली आहे हे कागदोपत्री दाखवायचं आहे. वृक्षतोड करण्याला विरोध होतो म्हणून हे पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया आहे. मात्र त्यांची देखभाल आणि देखरेख करण्याची जबाबदारी मुंबई मेट्रो पार पडत नाहीये त्याचे हे परिणाम आहे.

- देबी गोयंका, पर्यावरण तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT