Jiah Khan 
मुंबई

Jiah Khan: बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार? उद्या होणार फैसला

दहा वर्षानंतर या प्रकरणात अंतिम निकाल येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात उद्या विशेष सीबीआय कोर्टाचा अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळं तिच्या मृत्यूला नक्की कोण कारणीभूत आहे, हे स्पष्ट होईल. गेल्या दहा वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरु होती. (Mumbai Special CBI court to deliver final verdict in Jiah Khan suicide case tomorrow)

अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्यावर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ३ जून २०१३ रोजी जियानं तिच्या जुहू येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी जियानं सहा पानी पत्र लिहून ठेवलं होतं. या पत्राच्या आधारे सूरज पांचोलीवर आरोप ठेवण्यात आला होता.

सीबीआयच्या माहितीनुसार, 10 जून 2013 रोजी मुंबई पोलिसांनी जप्त केलेलं पत्र जिया खाननं लिहिलं होतं. सीबीआयनं दावा केला आहे की, "या चिठ्ठीत सूरज पांचोलीसोबत जियाचे खास संबंध होते तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्यानं तिनं आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहिलं होतं" सेशन्स कोर्टानं 2021मध्ये विशेष सीबीआय कोर्टाकडं हे प्रकरण पुन्हा सोपवलं. कारण सीबीआयनं या प्रकरणाचा तपास केला होता. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर गेल्या आठवड्यात या खटल्याचा निकाल २८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता.

या खटल्यातील प्रमुख फिर्यादी साक्षीदार जिया खानची आई राबिया खान यांनी कोर्टाला सांगितलं की, ही आत्महत्या नसून खूनाचा गुन्हा आहे. त्यामुळं या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टात गेल्या वर्षी दाखल केली होती. पण हायकोर्टानं ती फेटाळून लावली होती. दरम्यान, राबिया खान यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले होते. आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याचं सिद्ध करण्यासाठी पोलीस आणि सीबीआयने कायदेशीर पुरावे गोळा केले नसल्याचा आरोप जियाच्या आईनं केला होता.

दरम्यान, आरोपी सूरज पांचोलीनं कोर्टासमोर सादर केलेल्या 313 पानांच्या निवेदनात, तपास आणि आरोपपत्र खोटे असल्याचा दावा केला होता. तसेच फिर्यादी राबिया खान, पोलीस आणि सीबीआय यांच्या सांगण्यावरून फिर्यादी साक्षीदारांनी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली असा आरोपही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT