Deven Bharti Sakal
मुंबई

Mumbai : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतीना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाचा दर्जा

33 अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र केडरमधील मुंबई पोलिसांचे पहिले विशेष आयुक्त देवेन भारती यांचा समावेश आहे. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या भारतीने शालेय शिक्षण झारखंडमधून पूर्ण केले आणि मुंबई पोलिसांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय पोलीस सेवेच्या आयपीएस 1994-बॅचमधील 33 अधिका-यांना केंद्रीय नियुक्त्यांकरिता अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून देशभरात नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

यादीतील 33 अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र केडरमधील मुंबई पोलिसांचे पहिले विशेष आयुक्त देवेन भारती यांचा समावेश आहे. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या भारतीने शालेय शिक्षण झारखंडमधून पूर्ण केले आणि मुंबई पोलिसांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिले आहे.

पहिले विशेष आयुक्त

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची यावर्षी 5 जानेवारी रोजी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.मुंबई पोलिस दलामध्ये विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले.

आयपीएस देवेन भारती यांना या पदावर पहिली नियुक्ती मिळाली आहे. अशाप्रकारे देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच हे पद निर्माण करण्यात आले आहे.

फडणवीसांशी जवळीक आणि कारकीर्द

भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते 2014 ते 2019 पर्यंत पोलिस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना, जे डे यांच्या मृत्यू प्रकरणासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला होता.

भारती यांचा अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ होता. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना साइड पोस्टिंग देण्यात आली होती.

त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले होते.त्यापूर्वी दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली होती.

राज्यातील इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कारवायांवर वचक आणण्यासाठी भारती यांनी भरीव कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT