Mumbai Sakal
मुंबई

मुंबई : एसटीला गणपती पावला !

जादा गाड्यांमुळे पावणेआठ कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या जादा गाड्यांच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला तब्बल सात कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवात ५ ते २० सप्टेंबरदरम्यान 'गणपती विशेष' ३२९० बसेसहारे सुमारे तीन लाख ९६ हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली.

यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता; परंतु सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखविल्याने अवघ्या दिवसांत जादा गणपती विशेष गाड्या फूल झाल्या होत्या. मिळालेल्या एसटीला चाकरमान्यांकडून प्रतिसादामुळे गणेशोत्सवादरम्यान सुमारे ३२९० गाड्या सोडाव्या लागल्या. ५ ते २० सप्टेंबरदरम्यान तब्बल ३२९० बसेसद्वारे ८२९९ फेल्या पार पडल्या. यामधून एसटीला मात कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे अॅड. परब यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Chemical Factory Blast : साताऱ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, १० किलोमीटरपर्यंत परिसर हादरला

बापरे! शुटिंगनंतर समुद्रात गेला अन्...! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, अभिनेत्रीसमोरच घडली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीला २ एप्रिल पर्यंत यलो अलर्ट

White Squirrel Kolhapur : नेहमीची खार विसरा, ही आहे खास! कोल्हापुरात आढळली चक्क पांढरी शुभ्र खारुताई; काय आहे यामागचं रहस्य?

IPL 2026: बंगळूर संघाविरुद्ध सुमार गोलंदाजीचा फटका; सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची निराशा

SCROLL FOR NEXT