bmc election  sakal
मुंबई

Mumbai : मनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांवरील ईडी चौकशी थांबवा! म्युनिसिपल मजदूर संघाची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कोरोनाच्या संकटात जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस मुंबई महापालिकेतील कर्मचारी- अधिका-यांनी सेवा दिली आहे. त्यांच्या या कार्याचे जगभरात कौतुक झाले आहे. असे असताना राजकीय सूड भावनेतून पालिकेतील कर्मचारी- अधिकाऱ्यांची ईडी चौकशी केली जाते आहे.

या कारवाईमुळे कर्मचा-यांचे मानसिक मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे ईडी चौकशी बंद करा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केली आहे. ईडी चौकशी सुरु राहिल्यास पालिका कर्मचारी ईडी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाईल असेही जाधव यांनी म्हटले आहे.

कोविड काळातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असून पालिकेच्या कार्यालयात छापे टाकून काही अधिका-यांची ईडी चौकशी केली जाते आहे. कोविडच्या संकटात पालिकेच्या कर्मचारी- अधिका-यांनी दिवस -रात्र सेवा दिली आहे. सेवा देताना जवळपास ३०० कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची जगाने कौतुक केले आहे.

असे असताना सुडाच्या राजकारण म्हणून कोविड काळातील खर्चाची ईडी मार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे. ईडी चौकशीमुळे कर्मचारी- अधिका-यांचे मानसिक मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे ईडी चौकशी बंद करा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT