Mumbai news 
मुंबई

Mumbai : एसटीचे बस स्थानक खड्डेमुक्त घोषणेची पोलखोल; मुख्यालयातील सेंट्रल स्थानकात खड्डेच खड्डे

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळ प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीच मुंबई सेंट्रल एसटीचे बस स्थानकावरील खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगून प्रसिध्दी मिळवली होती. एसटी मुख्यालयाच्या इमारतीला लागून असलेल्या मुंबई सेंट्रल बस स्थानक जणूकाही सर्वगुणसंपन्न सुविधेने परिपूर्ण असल्याचा आव आणण्यात आला होता. मात्र, पहिल्याच संततधार पावसाने एसटी प्रशासनाच्या दिखाव्यावर पाणी फिरले आहे.

मुंबईत सोमवार पासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी भरले आहे. त्याचप्रमाणे, मुंबई सेंट्रल एसटी बस स्थानकातील खड्डे सुद्धा पाण्याने भरून निघाले आहे. जे खड्डे बुजवण्यात आल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. तेही खड्डे पाण्याने भरलेले दिसून येत आहे.

१ मे रोजी स्वच्छ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छ सुंदर बस स्थानकांच्या उपक्रमाचे उद्घाटन केले आहे. त्याप्रमाणे बस स्थानकांच्या परिसर, स्वच्छतागृहे, बसेस पूर्णतः स्वच्छ सुंदर ठेवण्याची एसटी प्रशासनावर जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणात प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवण्याच्या सूचना महामंडळाला त्यांनी दिल्या होत्या.

शिवाय, बस स्थानकातील परिसराचे काँक्रीटीकरण करण्यासाठी नुकतीच त्यांनी ५०० कोटींची घोषणा सुद्धा केली होती. मात्र, सध्यास्थितीत एसटी मुख्यालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकात प्रवाशांना चिखल तुडवत बस मध्ये बसण्याची कसरत करावी लागत आहे.

बस स्थानक परिसरात तब्बल १५ ते २० फुट रूंद खड्ड्यात पाणी साचल्याने, सपाट जागा दिसणे कठीण झाले आहे. मुंबई सेंट्रल बस स्थानकावरून कोकण, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर अशा अनेक मार्गावर बसेस धावतात, त्यामुळे दिवसभर प्रवाशांची रेलचेल दिसून येते.

शिवाय, बस फेऱ्या सुद्धा त्याचप्रमाणे नियमित सुरू राहत असल्याने स्थानक परिसरात अधिक खड्डे पडले आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्याचे काम सुद्धा दिसून येत नसल्याने, एसटी महामंडळाचा खड्डे बुजवण्याचा खर्च सुद्धा पाण्यात गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

ड्रेनेज सिस्टीम नादुरुस्त

डेपो परिसरात इमारतीवरून पडणारे पाणी आणि पावसाचे पाणी रस्त्याच्या मेन लाईनवर जाण्याची सुविधा आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाणी जाण्याची ड्रेनेज सिस्टीम बंदच आहे. त्याची दुरुस्ती झाली नसल्याने संपूर्ण पाणी डेपो परिसरातच साचून राहत आहे. परिणामी चिखल होऊन प्रवाशांना या चिखल तुडवत बस पकडावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

डेपो मॅनेजर दीड महिन्यांपासून रजेवर

मे महिन्यापासून मुंबई सेंट्रल डेपो मॅनेजर रजेवर असल्याने सध्या डेपोचा चार्ज मुंबई विभाग नियंत्रक कार्यालयातील डीटीओ अरुण बंडगर यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, बंडगर सातत्याने आजारी राहत असल्याने ते सुद्धा वैद्यकीय रजेवर असल्याचे समजते. त्यामुळे एकूणच मुंबई सेंट्रल डेपोच्या स्वच्छ सुंदर मोहिमेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

डेपो परिसरातील संपूर्ण खड्डे भरले आहे. ज्याकाही खड्यात पाणी साचत असेल, त्यासंदर्भातील माहिती घेऊन बांधकाम विभागाशी बोलतो. शिवाय पाण्याचा निचरा करणेसाठी महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क करून, सर्वतोपरी प्रयत्न करतो.

- मोनिका वानखडे, विभाग नियंत्रक, मुंबई

मुंबई सेंटर बस स्थानकावरील ४८ क्युबिक मीटरचे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले आहे. टेंडर कॉस्ट प्रमाणे साडे चार लाख रुपये त्यासाठी खर्च आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे आताच बस स्थानकाची पाहणी करतो. जर खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट झाले असेल तर पुन्हा खड्यांचे काम त्या कंत्राटदाराकडून करून घेणार, त्याचे अजूनही पैसे आपण दिलेले नाही.

- विद्या भिल्लारकर, उपमहाव्यवस्थापक, बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT