मुंबई

आदित्य ठाकरेंच्या टॅबमध्ये मेमरी कार्डच नाही! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेने युवानेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आधुनिक शिक्षण देण्यासाठी आणि दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा गाजावाजा करत टॅबचे वाटप केले होते; मात्र हजारो विद्यार्थ्यांचे टॅब मेमरी कार्डअभावी पडून आहेत. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षण खात्याला धारेवर धरत नाराजी व्यक्त केली. त्यावर शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी 9 जानेवारी 2020 ला होणाऱ्या विशेष बैठकीत टॅबच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश प्रशासनाला दिले. 

मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यासाठी 2014 पासून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 40 हजार टॅब देण्यात आले; मात्र बहुसंख्य टॅब मेमरी कार्डअभावी बंदच आहेत. आता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर आलेली आहे; मात्र तरीही शिक्षण विभागाकडून अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी तक्रार सईदा खान यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत केली.

विद्यार्थ्यांना सुस्थितीतील टॅब अभ्यासासाठी उपलब्ध होत नसल्याने खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला. 

पालिका शाळांत देण्यात आलेल्या टॅबची संख्या किती, किती टॅब बंद झाले, किती वापरात आहेत आदींबाबतची सर्व माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली. अन्य सदस्यांनीही, जर टॅब देऊनही त्याचा योग्य वापर होत नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल करीत प्रशासनावर चांगलीच तोफ डागली. 

खर्च करण्यापेक्षा नवीन टॅब घ्या 
टॅबखरेदीसाठी अगोदरच पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला आहे. आता एवढ्या कालावधीनंतर दुरुस्तीसाठी आणखी पैसे खर्च करण्यापेक्षा पालिकेने नवीन टॅब खरेदी करावेत, अशी सूचनाही साईनाथ दुर्गे यांनी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT