funding  esakal
मुंबई

Mumbai News : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ९७६ कोटी रूपयांचा निधी

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेत एकूण ९७६.७१ कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेत एकूण ९७६.७१ कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असून प्रत्येक वॉर्डातील झोपडपट्टीत रस्ते काँक्रिटीकरणाबरोबरच मुलभूत सोयी - सुविधांची निर्मिती केली जाईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

यातून दोन हजार महापालिका शाळांमध्ये व्यायामशाळा उभारण्यात येईल असेही ते म्हणाले. मुंबई उपनगर जिल्हा समितीच्या बैठकीत लोढा यांनी ही माहिती दिली.

झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, खेळाची मैदाने, आंगणवाड्या, उद्याने, अशी कामे तसेच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, आरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात येतील, असेही लोढा म्हणाले.

अन्य तरतुदी

  • नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा - ४८८.४८ कोटी

  • झोपडपट्टीतील संरक्षक भिंत बांधकामे - ११५ कोटी

  • कौशल्य विकास कार्यक्रम - ५ कोटी

  • नाविन्यपुर्ण योजना- २७.९७ कोटी, दलितवस्ती सुधार योजना - ४७.५१ कोटी

महिला व बाल विकास विभागाच्या १८.६५ कोटी रूपयांच्या निधीमधून जिल्ह्यात महिला व बाल भवन बांधण्याचे प्रस्तावित असून चेंबुर येथील चिल्ड्र एड सोसायटीच्या मोकळ्या जागेवर ते उभारले जाईल. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मॉलच्या धर्तीवर इमारत ऊभारणे, महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय संस्थांचे बळकटीकरण, बाल विकास प्रकल्पांतर्गत आंगणवाड्यांचा विकास आदी कामेही केली जातील.

पर्यटन विकासासाठी मुलभूत सुविधांकरीता ६५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर पोलीसांच्या निवासी क्षेत्रात जागेच्या उपलब्धतेप्रमाणे खेळांचे मैदान, कौशल्य विकास केंद्र विकसित करणे, पोलीस विभागाच्या वाहतूक व्यवस्थेसाठी वाहने पुरविणे, संगणक व अनुषंगिक साहित्य.व्यायाम शाळांचा विकासासाठी १४ लाख रुपये दिले जातील, असेही लोढा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT