चोरी  sakal
मुंबई

Mumbai : स्वामी समर्थ मठ आवारातील चारचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीत कैद

20 दिवस उलटले पण गाडीचा तपास नाही

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाच्या परिसरातील एक चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यानी चोरुन नेली आहे. रमेश शिंत्रे यांची पांढऱ्या रंगाची गाडी चोरटे चोरून नेत असल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरीची घटना घडून 20 दिवस उलटले आहेत मात्र अद्याप गाडीचा शोध लागला नसून चोरटे देखील मोकाट फिरत आहेत.

कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाच्या परिसरातुन चारचाकी गाडी 9 जून ला चोरीला गेली होती. ही गाडी रमेश शिंत्रे यांनी स्वामी समर्थ मठाचे उत्तराधिकारी सचिन चांदे आणि प्रथमेश मोडक महाराज यांच्या सेवेसाठी दिली होती. मठातील

महाराजांना इतर ठिकाणी मठामध्ये व कार्यक्रमासाठी जाण्यासाठी या वाहनाचा वापर केला जात होता. ही गाडी 9 जून रोजी मठाच्या परिसरातून काही अज्ञात व्यक्तीनी चोरी केली. यासंदर्भातील तक्रार खडकपाडा पोलीस ठणयात देऊन 20 दिवस उलटूनही अद्याप चोरटे मोकटच आहे. यामुळे लवकरात लवकर गाडीचा छडा लावावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी स्वामी समर्थ मठातील सेवक दुषांत ढवळे यांनी केली आहे. तसेच चारचाकी वाहन चोरीला जात असल्याने परिसरातील इतर वाहनचालकांन मध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : विद्यार्थ्यांना मुख्य संदेश हाच द्यायचा आहे की, आम्ही तुमच्या सोबत आहोत - राहुल गांधी

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT