crime  sakal
मुंबई

Mumbai crime : देवाचे नाव घेत 101 पावले चाला बरकत होईल; दोघा भामट्यांनी 90 हजाराला लुटले

याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : अंधश्रद्धे पायी अनेकांची लुबाडणूक होत असतानाही नागरिक त्याचा बळी जात आहेत. डोंबिवलीत दोघा भामट्यांनी एका तरुणाला देवा धर्माच्या नावाखाली आयुष्यात बरकत होण्यासाठी 101 पावले चालण्यास सांगितले. त्याला बोलण्यात गुंतवूण त्याच्या कडील 90 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे भामट्यांचा शोध सुरु केला आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणारे शंतनू मिश्रा (वय 39) हे शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास फडके रोडने जात होते. येथील एका एटीएममधून त्यांनी 5 हजार रुपये काढले. त्यानंतर रस्त्याने पायी चालत जात रेल्वे स्टेशन कडे जात असताना बाटा शोरुम जवळ दोघा व्यक्तींनी त्यांना थांबवले. शंतनू यांना देवी देवतांविषयी माहिती देत बोलण्यात गुंतविले. त्यातील एकाने तुम्ही आता श्री गणेशाचा मनात जप करत 101 पावले चाला.

त्याकरिता तुमच्याकडे असलेल्या सर्व वस्तू बॅगेत ठेवा. त्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन शंतनू यांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, टाईटन कंपनीचे घड्याळ, 5 हजारांची रोकड, बँकेची कागदपत्रे, एटीएम कार्ड बॅगेत ठेवले. तुम्ही आता मत्र जंप सुरू करा आणि तुमच्या हातातील बॅग माझ्या मित्राकडे द्या आणि तुम्ही आता सरळ 101 पावले चालत जा, असे सांगितले. शंतनू यांनी चालण्यास सुरूवात केली.

थोडे अंतर पुढे जाऊन पाठीमागे वळून पाहिले असता ते दोन्ही अनोळखी इसम दिसेनासे झाले. या प्रकाराने शंतनू यांनी कपाळावर हात मारून घेतला. आपली चक्क फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकारची हकीकत सांगितली. पोलिसांनी शंतनू यांच्या तक्रारीवरून दोघा फरार भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पथके तैनात करत सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे भामट्यांचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT