Mumbai ac Local esakal
मुंबई

Mumbai : एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड! दोन डब्यातील एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अगोदरच तापमान वाढल्याने उन्हाच्या काहिलीने घामांच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकराना बुधवारी (ता.२४) एसी लोकलच्या तांत्रीक बिघाडामुळे मोठी गैरसोय झाली आहे. विरार- चर्चगेट जलद एसी लोकलमधील दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा श्वास कोंडला होता.

अखेर वांद्रे स्थानकात एसी लोकलला थांबवून बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे चर्चगेटचा दिशेने जाणाऱ्या लोकल सेवांचा वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभावर संताप व्यक केला जात आहे

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७.५६ मिनिटांची विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यानंतर वातानुकूलित यंत्रणांमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे प्रवाशांना श्वास गुदमरात होता. प्रवाशांना सुद्धा प्रचंड उष्णतेचा त्रास होत असल्याने प्रवाशांनी यांसंदर्भात रेल्वेकडे तक्रार केली.

प्रवासी लोकलचा दरवाजा बंदच होऊन देत नसल्याने भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली या स्थानकावर लोकल जादा वेळ थांबवण्यात आली. त्यानंतर वांद्रे स्थानकांवर या एसी लोकलला थांबविण्यात आली. हा बिघाडा दुरुस्त करण्यात आला आहे, त्यानंतर लोकल चर्चगेट दिशेकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागेएक खोळंबल्या होत्या. परिणामी अनेक जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

रेल्वे मंत्र्यांनी लक्ष द्यावे !

भर उन्हाळयात एसी लोकलमध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. या बिघाडामुळे सध्या लोकलचा वेळापत्रकावर परिणाम होत आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासन त्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.रेल्वे मंत्र्यांनी मुंबईकरांसाठी सुरु केल्या एसी लोकलकडे लक्ष द्यावेत अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी समाजमाध्यमानावर दिली आहे.

उन्हाळाच्या हिट असल्याने उकाडा खूपच वाढलेला आहे.त्यामुळे प्रवासी तिप्पटीने पैसे मोजून एसी लोकलचा प्रवास करत आहे. मात्र, अशा वेळी लोकलमधील एसीच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना एसी विना प्रवास करावाला लागला आहे. रेल्वे प्रशासनाचा या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT