mumbai sakal
मुंबई

Mumbai : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम लवकरच सुरु होणार

एल अँड टी आणि मेघा इनफ्रास्ट्रक्चर या कंपन्या ठरल्या सर्वात कमी बोलीदार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लार्सन अँड टुब्रो आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) या दोन कंपन्यांना ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या बांधकामासाठी ११.८४ किमीच्या प्रत्येकी एका पॅकेजसाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालुन २ x १०.८ किमी लांबीचे २ बोगदे आणि दोन्ही टोकांना एकत्रित १ किमीचे रस्ते बांधले जातील.

प्रत्येकी ३ लेन असलेले २ बोगदे ४ मेगा टनेल बोरिंग मशीन वापरून पृष्ठभागाखाली जास्तीत जास्त २३ मीटर खोलीवर बांधले जातील आणि बोरिवलीतील मागा ठाणेचे एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी यांना जोडले जातील.

एमएमआरडीएने डिसेंबर २०२२मध्ये २ सिव्हिल पॅकेज अंतर्गत त्याच्या नागरी बांधकामासाठी ४ वर्ष पूर्ण करण्याच्या मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत रु. १३,२०० कोटी इतकी आहे. लार्सन अँड टुब्रो आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या दोघांनी या कामासाठी स्वारस्य दाखविले होते.

या कामासाठी तांत्रिक बोली या महिन्याच्या सुरुवातीला उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये या दोन्ही कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले.

यात पॅकेज १ मध्ये, बोरिवलीपासून ५.७५ किमी अंतरासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी एल अँड टी आहे, तर पॅकेज २साठी, ठाणे पासून ६.०९ किमी अंतरासाठी सर्वात कमी बोली लावणारी मेघा इंजिनिअरिंग (MEI) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT