Mumbai News esakal
मुंबई

Thane : 'सर्व युगात सर्वश्रेष्ठ लतायुग' CM शिंदे यांच्या हस्ते भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : ‘‘आतापर्यंत चार युगे होऊन गेली, पण कलियुगातही सर्वश्रेष्ठ युग म्हणजे लतायुग, गानकोकिळा लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. पहाटेच्या भूपाळीपासून ते रात्रीच्या अंगाईपर्यंत त्यांनी गायलेल्या गाण्याचे स्वर आपल्या कानी येतात. त्यांची ही स्मृती कायम राहावी, याच भावनेतून ठाण्यात भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाची उभारणी होत आहेत,’’ अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या संगीत गुरुकुलातून भविष्यात उत्तम गायक, संगीतकार, गीतकार तयार होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड येथे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कृष्णा आदिनाथ मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाण्याचे बदलते रूप बघून शहराला साजेशी इमारत लता मंगेशकर गुरुकुलसाठी उभारली जात आहे. त्याचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी या सोहळ्यात केले. तसेच, हे संगीत विद्यालय चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT