British-era cannons  
मुंबई

Mumbai : ब्रिटीशकालीन तोफांचा इतिहास उलगडणार; महापालिकेच्या दोन उद्यानांच्या सौंदर्यात पडणार भर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६७ वर्षे जुन्या तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क'मध्ये काही वर्षांपूर्वी आढळून आल्या होत्या. घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे 'लायन्स चिल्ड्रन पार्क' या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत.

घाटकोपर पूर्व परिसरात असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क'मध्ये काही वर्षांपूर्वी दोन जुन्या तोफा आढळून आल्या होत्या. या दोन्ही तोफांची आता पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसविण्यात आल्या आहेत, असे पालिकेचे पुरातन वास्तू जतन अभियंता खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.

ईस्ट इंडिया कंपनी'च्या नोंदी

'ईस्ट इंडिया कंपनी'च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील चाकांचा घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन‌ १८५६ या‌ वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपी मध्ये 'एन सी पी सी' अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत, असेही निघोट म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT