Mumbai Sakal
मुंबई

मुंबई : महापौरांनी केली कोविड योध्यांची ओवाळणी

आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीज साजरी केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड काळात जिव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या सहा बंधूची ओवाळणी करुन आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीज साजरी केली.

वांद्रे कुर्ला संकुल जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.महारुद्र कुंभार, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई दक्षिण विभागाचे महाप्रबंधक मनोज करे, बॅंक ऑफ महाराष्ट्र केंद्रीय कार्यालय पुणे येथील व्यवसाय बुद्धि विभागाचे उपमहाप्रबंधक अतुल जोशी, कालिदास कावले, भिवंडी येथील शिवस्पर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरलाल फरमन यांची ओवाळणी महापौरांनी केली.

ही ओवाळणी प्रातिनिधीक असून कोविड काळात जिव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा मान असल्याचे महापौरांनी नमुद केले.तसेच,ओवाळणी महापौर निधीला अर्पण करण्याचे आवाहनही महापौरांनी केले.बॅक ऑफ महाराष्ट्राने राज्यात ओढावलेल्या पुर संकटाच्या वेळीही सहकार्य केले असल्याचा उल्लेख महापौरांनी यावेळी आवर्जुन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Mumbai News: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

SCROLL FOR NEXT