Mumbai sakal
मुंबई

मुंबई : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

निर्णयामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आठ पैकी केवळ दोन संचालक आणि एका सनदी अधिकाऱ्यावर राज्य शालेय शिक्षण विभागाचा कारभार सुरू असताना काल रात्री उशीरा यातील दोन्ही संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांना साईडलाईन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांची थेट अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. या दोन्हीही बदल्या प्रशासकीय असल्याचा दावा शिक्षण विभागाने काढलेल्या जीआर मध्ये केला असला तरी महत्वाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे आणि एका सल्लागारांने केलेल्या आग्रहामुळे साईडलाईन केल्याचे अधिकारी वर्गात बोलले जात आहे. शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात बाह्य व्यक्तीचा अधिक हस्तक्षेप वाढल्यामुळे या बदल्या झाल्या असल्याचेही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या जीआरमध्ये बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्विकारावा तसेच त्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये. बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरुपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील अशी तंबी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT