Hotel Lalit 
मुंबई

तीन लाखांसाठी THE LaliT हॉटेल उडवण्याची दिली धमकी; दोघांना गुजरातमधून अटक!

धमकी देणाऱ्यांनी ५ कोटींच्या खंडणीची मागणीही केली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल दि ललीत उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघा संशयितांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील वापी इथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आजच त्यांना मुंबईत आणण्यात आलं असून उद्या त्यांना स्थानिक कोर्टात हजर केलं जाणार आहे. (Mumbai those who threatened to blow up the Lalit Hotel were arrested from Gujarat)

पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रम कुमार सिंह (वय २५) आणि इशू कुमार सिंह (वय १९) या दोन संशयीत आरोपींना मुंबई पोलिसांनी गुजरातमधील वापी इथून अटक केली. या आरोपींमधील विक्रम कुमारला तीन लाख रुपयांची गरज होती. हे पैसे गोळा करण्यासाठी त्यानं हा खंडणीचा प्लॅन आखला होता. त्यासाठी त्यानं बनावट कागदपत्रांद्वारे एक सिमकार्ड विकत घेतलं त्यानंतर त्या सिमकार्डच्या माध्यमातून त्यानं हॉटेल ललीत उडवून देण्याची धमकी दिली.

५ कोटींची मागितली खंडणी

काही अज्ञात व्यक्तींनी काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या हॉटेलमध्ये फोनवरुन ही धमकी दिली होती. धमकी देताना त्यांनी म्हटलं होतं की, हॉटेलमधील चार विविध ठिकाणी बॉम्ब ठेवले असून ते निकामी करण्यासाठी ५ कोटी रुपयांची खंडणीही त्यांनी मागितली होती.

सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या धमकी आणि खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सहार पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच याप्रकरणाच्या तपासाची सुत्र वेगानं फिरवली होती. दरम्यान, आज (बुधवारी) हा धमकीचा कॉल करणाऱ्या दोघांचा माग पोलिसांना लागला. याची लिंक गुजरातमधील वापीपर्यंत जाऊन पोहोचली. धमकी देणाऱ्या संशयीतांचा ठिकाणा कळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना थेट वापी इथून ताब्यात घेतलं. आज रात्री या संशयीत आरोपींना मुंबईत आणण्यात आलं असून उद्या त्यांना स्थानिक कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. या ठिकाणी पोलीस त्यांच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करु शकतात.

दरम्यान, धमकीनंतर पोलिसांनी तपासाची सुत्र हलवली होती, यासाठी सायबर पोलिसांचीदेखील मदत घेतली गेली. फोन करून धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण? असे करण्यामागे नेमका उद्देश काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. दरम्यान, धमकीनंतर हॉटेलची तपासणी केली असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्फोटकं आढळून आली नाहीत. त्यामुळे हा फेक कॉल होता हे उघड झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT