Sameer Wankhede Team eSakal
मुंबई

Mumbai : IRS समीर वानखेडेंना आंतराराष्ट्रीय पातळीवरून धमकी? क्रांती रेडकर करणार तक्रार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरुन धमकी देण्यात येत आल्याचं समोर आलं आहे. धमकी बनवत ट्विटर अकाऊंटवरून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने देण्यात आली आहे..त्यांच्यासह त्यांच्या मुलींचाही या धमकीत उल्लेख आहे. सातत्याने धमक्या येत असल्याने पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने दिली.

क्रांती रेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. धमक्या आणि या सगळ्या गोष्टी ट्रोल ज्याला म्हणतो हे खूप आदीपासून येत होतं. ते आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण, आता हे दोन हँडल्स नॅशनल नाहीत, ती इंटरनॅशनल अकाऊंट आहेत, असं त्या म्हणाल्या. लोकं दाऊदचं नाव घेऊन धमक्या देत आहेत.

ती लोकं भारताला शिवीगाळ करत आहेत, भारताच्या सरकारला शिवीगाळ करत आहेत. माझ्या पतीला शिवीगाळ करत आहेत, आमच्या मुलांना शिवीगाळ करत आहेत. आमच्यावर अॅसिड हल्ला झालं तर काय असा विचार मनात येतो, त्यामुळं आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

काही दिवसांपासून 'एनसीबी'चे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. आर्यन खान प्रकरणात वानखेडेंवर गंभीर आरोप झाल्याने सीबीआयने वानखेडें विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच समीर वानखेडे यांच्या घरावर छापादेखील टाकण्यात आला होता.

सीबीआय विरोधात वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेत न्याय देण्याची मागणी केली होती. यांनतर, त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. आता त्यांना ट्विटरवरून धमकी मिळाल्याने वानखेडेंनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT