accident
accident 
मुंबई

मुबंई - पुणे जुन्या महामार्गावर दोन अपघातात  तिघांचा मृत्यु

सकाळवृत्तसेवा

मुबंई - पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे वर सोमवारी पहाटे  घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पहिला अपघात मुबंई - पुणे महामार्गावर खोपोलीशहर गिरनार कॉर्नर जवळ  रात्री तीन वाजता तर दुसरा अपघात एक्स्प्रेस वे वरील किमी 21 वरील टंबरी गावच्या जवळ सकाळी  साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघाताच्या माहितीनुसार, अतिवेग व असुरक्षित वाहने हाकन्याने हे तीन बळी गेल्याचे स्पष्ट झाले.

सोमवारचा दिवड उजाळला तो दोन भयंकर अपघाताच्या घटनांनी. पहिला अपघात मुबंई -पुणे जुना माहामार्गावर खोपोली शहरातील गिरनार कॉर्नर येथे घडला. दुचाकी वरून प्रवास करीत असलेल्या अमीर  शेख व महमूद रसूल, रा.नवी मुंबई यांना अज्ञात वाहनाने ठोकर दिली. यात दुचाकी चालक महमूद रसूल वय 34 हा मृत्यू पावला तर मागे बसलेला अमीर शेख गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरा अपघात मुबंई -पुणे एक्स्प्रेस वे किमी 21 पुढील टंबरी गावाजवळ घडला. यात मुबंई ते पुणे दिशेच्या तिसऱ्या जड वाहतूक लेन वरील ट्रकला भरधाव वेगात कारने धडक दिली व भीषण अपघात घडला. यात कार मधील चालक व पुढे बसलेला साईकुमार व्यकटा वय 33 व लेखी चैतन्य वय 28 रा. हैद्राबाद हे जागीच मृत्यू पावले. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. सदर अपघात चुकीच्या लेनवर अतिवेगात असुरक्षित वाहन चालविण्यामुळे घडला. तर दुचाकी स्वारचा अपघातातील मुलांनी हेल्मेट परिधान केले असते तर कदाचित सदर व्यक्ती वाचला असता. हे दोन्हीही अपघात असुरक्षित व अतिवेगात वाहन चालविण्यामुळे घडल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट होते. या दोन्ही अपघातात खोपोली अपघात ग्रस्त मदतीसाठी सक्रिय ग्रुपने तत्काळ मदत करून जखमींना उपचारासाठी दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT