house  sakal
मुंबई

मुंबई : चुनाभट्टीत घरावर दरड कोसळली, तीन जखमी

डोंगरावर व डोंगराच्या पायथ्याशी मोठया प्रमाणात झोपटपट्टी वसलेली आहे.

जीवन तांबे - सकाळ वृ्त्तसेवा

मुंबई : चुनाभट्टी येथील स्वदेशी मिलजवळील नागोबा चौक परिसरातील नारायण हडके चाळीतील तीन घरावर बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून प्रकाश सोनवणे (वय 40), शिवम सोनवणे (वय 11) आणि सुरेखा वीरकर (वय 28) अशी या जखमींची नावे आहेत.

स्वदेशी मिलजवळ परिसरात मोठा डोंगर आहे. या डोंगरावर व डोंगराच्या पायथ्याशी मोठया प्रमाणात झोपटपट्टी वसलेली आहे. पावसाळ्यात चार महिन्यापूर्वी चुनाभट्टी हिंदू स्मशान भूमी दर कोसळल्याची घटना घडली होती. तर गेल्यावर्षी नागबो चौक व कसाई वाडा परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. बुधवारी सकाळी या डोंगरावरील एक भली मोठी दरड तीन घरावर कोसळली. त्यात एकाच घरातील दोघे व दुसऱ्या घरातील एक महिला असे तीन जण जखमी झाले आहेत.

याबाबत स्थानिक नागरिकांनी चुनाभट्टी पोलीस ठाणे व अग्निशामक दलाला माहिती दिली असता अग्निशामक दल व पोलीस व पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचाराकरिता सायन रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकाश सोनवणे यांच्या हाताला व पायाला जबर दुखापत झाली आहेत तर सुरेखा वीरकर यांच्या डोक्याला मार लागला आहे.

जखमींवर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहे. या परिसरातील धोकादायक घरांना पर्यायी घरे देण्यात यावी अशी मागणी समाजसेवक जितेंद्र जाधव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Marathi Live Updates News: राज ठाकरे यांनी घेतले डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

IND vs SL, Test: भारताची चिंता वाढली! ७ ऑगस्टच्या सामन्याबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT