Mumbai rain update 
मुंबई

Mumbai : पोलिसांवर चौकीतच पाण्यात उभे राहून काम कराण्याची वेळ; तासाभराच्या पावसाने पोलीस ठाणे तुडुंब

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - पावसाळा सुरू होत नाही तोच मानपाडा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. जोरदार पाऊस येताच पोलीस ठाण्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. यंदाही अवघ्या तासाभराच्या पावसाने पोलीस ठाण्यात पाणी शिरले आणि पाण्यात उभे राहून काम करायची वेळ पोलिसांवर आली.

पावसाचा जोर कमी होताच काही प्रमाणात पाण्याचा निचरा झाला तरी पण अख्या पोलीस ठाण्यात पाणी असल्याने ठाण्यात येणारे नागरिक व पोलीस पाण्यात बसूनच काम करताना दिसले.

कल्याण डोंबिवली शहरात सकाळ पासूनच पावसाचा चांगला जोर राहिला आहे. अवघ्या काही तासांच्या पावसाने कल्याण डोंबिवली मधील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. शहरातील रस्ते पाण्याखाली तर गेलेच मात्र दुकान, चाळ परिसरातील घरांत देखील पाणी शिरल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

शहरातील अनेक परिसर हे जलमय झाल्याने केडीएमसीचा नालेसफाईचा दावा फेल ठरल्याचे दिसून येत आहे. नाले, गटारे तुंबून त्यातील पाणी रस्ते, दुकानात शिरले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कल्याण डोंबिवलीत बुधवारी सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा वेग कमी जास्त असून सकाळी 11 नंतर मात्र पावसाचा जोर वाढला. अवघ्या काही तासाभराच्या जोरदार पावसाने मात्र केडीएमसी प्रशासनाच्या नाले सफाई कामाची पोल खोलली आहे. डोंबिवली स्टेशन परिसरातील आगरकर रोड, पाटकर रोड, पथ रोड, केळकर रोडवर गुडघाभर पाणी साचले.

येथील दुकानांत देखील पावसाचे पाणी शिरले. तोच दुकानदारांची दुकानातील सामान हलविण्यासाठी धडपड सुरू झाली. दुकानातील पाण्याचा उपसा करूनही गटारातील पाणी दुकानात येत असल्याने अखेर दुकांदारांनीच गटारांची झाकणे उघडून पाण्याला वाट करून दिली.

यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी गटारे देखील तुंबलेली असल्याने गटारातील पाणीच काही ठिकाणी बाहेर येत असल्याचे दिसुन आले. यामुळे गटारांची सफाई नक्की झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरतील रस्त्यावर पाणी साचले होते. कल्याण नेतीवली परिसरातील चाळींमध्ये पाणी शिरले होते. तर कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकली परिसरात रस्त्यावर गुडघा भर पाणी साचल्याने नागरिक वाहनचालक, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले. याच परिसरातील अनेक चाळी इमारती मध्ये देखील पाणी शिरले होते.

डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरलं त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT