मुंबई

Mumbai: उड्डाणपुलाखालच्या अतिक्रमणातून मुंबई होणार मुक्त; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

Chinmay Jagtap

Mumbai: मुंबईतील उड्डाणपुलांच्‍या खाली होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी, तसेच त्‍या भागाच्या सौदर्यीकरणासाठी पालिकेने तेथे ‘हायटेक विकास’ करण्याचा विचार सुरू केला आहे. त्‍याचा पायलट प्रोजेक्‍ट भायखळा येथील ‘कुतूब ए कोकण मखदूम अली माहिमी’ (सर जे. जे.) उड्डाणपूल येथे लवकरच सुरू होणार आहे.

मुंबईतील मोठ्या उड्डाणपुलांपैकी एक असलेल्‍या जे. जे. पुलाखाली मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा असून तेथे अतिक्रमणामुळे बकाल स्वरूप आले आहे.

येथील अतिक्रमण रोखण्यासाठी मोकळ्या जागेवर सुशोभीकरणासह हायटेक विकास केला जाणार आहे. पालिकेचा हा प्रयोग यशस्वी झाला तर मुंबईतील इतर पुलांखालील मोकळ्या जागांवर अशाच प्रकारचा विकास करण्याचे विचाराधीन आहे.

असे आहे सध्‍याचे स्‍वरूप

सर जे. जे. उड्डाणपुलाचे नामकरण ‘कुतूब ए कोकण हजरत मखदूम अली माहिमी’ असे करण्यात आले आहे. हा उड्डाणपूल भायखळा ते सीएसएमटी यांना जोडणारा आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने व्यावसायिक इमारती आणि गाळे आहेत. त्यामुळे येथे नेहमीच व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी दिसते. यामुळे उड्डाणपुलाच्या खालील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय फेकलेला कचरा अडकल्याने घाण साचली आहे.

असा होईल विकास

उड्डाणपुलाखालील मोकळी जागा स्वच्छ करून ती लोखंडी तारांनी बंदिस्त केली जाणार आहे. त्याजागी या परिसराच्या सौदर्यांत भर घालेल अशी शिल्प बसवण्यात येणार आहेत. यासह येथे विशेष प्रकल्प राबवून मोकळ्या जागेचा योग्य वापर केला जाणार आहे. यासाठी बेस्टच्या निकामी गाड्यांचा वापर केला जाणार आहे. त्यात वाचनालय, कलादालन, उपाहारगृह तयार केले जाणार आहे. या परिसरामध्ये कामानिमित्त किंवा खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना उपयोग करता येईल असा प्रयत्न पालिकेडून सुरू आहे.

निविदा प्रक्रिया सुरू

पालिकेच्या ए, बी आणि सी विभागाने पायलट प्रोजेक्ट तयार केला आहे. यानंतर पालिकेने ई-निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले आहेत. पाच डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पालिका यावर ९ कोटी ६ लाख ५४ हजार ५०५ कोटी रुपये खर्च करत आहे.

शिक्षिण मुंबईतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. पुलाखालील मोकळ्या जागेचा चुकीचा वापर होत असून घाण होऊन दुर्गंधी पसरली आहे. यावर तोडगा म्हणून मोकळ्या जागेचा विकास केला जात आहे. यासाठी मुंबईत पहिल्यांदाच युनिक क्लसेप्ट वापरून विकास केला जात आहे. लोकांना ही कल्पना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.

-उद्धव चंदनशिवे, सहायक आयुक्त, बी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT