mumbai new mumbai thane news esakal
मुंबई

Mumbai News : मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छेडानगर जंक्शन उड्डाणपुलाचं लोकार्पण

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबई आणि नवी मुंबईतल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आणि मुंबईहून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता विना सिग्नल प्रवास करता येणार आहे. तासन्तास सिग्नलमध्ये घालवणाऱ्या वाहनधारकांना हा मोठा दिलासा आहे.

घाटकोपरच्या छेडानगर जंक्नशनवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्यामुळे प्रवाशांचे वेळ आणि मनःस्ताप संपणार आहे. या उड्डाणपुलामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहे.

छेडानगर जंक्शन येथे नवी मुंबईवरुन येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ सिग्नलवर जायचा. मात्र आता छेडानगर उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्याने ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना विना सिग्नल प्रवास करता येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले. तसेच छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील उड्डाणपुलाचेही लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे नवी मुंबईवरुन ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कुठलाही व्यत्यय येणार नाही. मुंबईकरांसाठी ही अत्यंत समाधान देणारी बातमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT