मुंबई

शौचकूप बांधणीची फसवाफसवी

विष्णू सोनवणे

मुंबई - मुंबईत झोपड्या आणि चाळींत तब्बल एक लाख शौचकुपांची कमतरता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर २०१८ या वर्षभरात १८ हजार शौचकूप बांधण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यापैकी आतापर्यंत पाच हजार १५३ शौचकूपच बांधून झाल्याने ही घोषणा फसवी असल्याचा आरोप होत आहे. 

यंदा १८ हजार ८१८ शौचकुपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये प्रशासकीय मान्यता दिली. यात एक मजली, दुमजली आणि तीन मजली शौचालयांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ८७ टक्के वाढीव दराच्या निविदा आल्या होत्या. झोपडपट्ट्यांमध्ये रस्ते नसल्याने मालाची वाहतूक करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर, मालाची चोरी आणि या योजनेतील गैरव्यवहार यामुळे जादा दराने निविदा येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. या शौचालयांच्या बांधणीसाठी ३७६ कोटींची तरतूद केली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून गेल्या जानेवारीमध्ये कामाला सुरुवात करण्याची घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती.  २० वर्षांत बांधलेली ११ हजार १७० शौचकूप धोकादायक स्थितीत आहेत. ते तोडून नव्याने बांधण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता; मात्र त्यांची पुनर्बांधणीही रखडली आहे.

शौचालय बांधणीच्या निविदा काढल्या आहेत. पाच हजार २०० शौचकूप बांधणीचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केले. या कामाला गती दिली आहे.
- विश्‍वास शंकरवार, पालिका उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

दुरुस्ती आणि पुनर्बांधणी रखडल्याने धोकादायक शौचालयांची संख्या वाढत आहे. फक्त घोषणा करून उपयोग नाही. 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT